Close
Search

Kozhikode Plane Crash: कोझिकोड मधील विमान अपघाताप्रकरणी जखमी झालेल्या 85 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

केरळ मधील कोझिकोड येथे ऑगस्ट 7 रोजी एअर इंडियाचे विमान लँन्डिंग होताना घसरल्याची धक्कादायक घडली होती. या मध्ये विमानाचा अर्धा भाग दरीत ही कोसळला होता. विमान अपघाताप्रकरणी 18 जणांनी आपला जीव गमावल्याने सर्व स्तरातून दु;ख व्यक्त करण्यात आले होते.

बातम्या Chanda Mandavkar|

Air India Express Plane Crash Update (Photo Credits: ANI)

केरळ मधील कोझिकोड येथे ऑगस्ट 7 रोजी एअर इंडियाचे विमान लँन्डिंग होताना घसरल्याची धक्कादायक घडली होती. या मध्ये विमानाचा अर्धा भाग दरीत ही कोसळला होता. विमान अपघाताप्रकरणी 18 जणांनी आपला जीव गमावल्याने सर्व स्तरातून दु;ख व्यक्त करण्यात आले होते. या अपघाताप्रकरणी काही जण जखमी झाले होते त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर आता यामधील 85 नागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती उत्तम असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

तर AAIB चे चीफ ए. हांडा यांनी असे म्हटले आहे की, या प्रकरणातील पुरावे सुद्धा जमा केले आहेत. विमान अपघाताप्रकरमी एकूण 127 प्रवासी जमखी झाले होते. तर 18 जणांनी जीव गमावला त्यात दोन वैमानिकांचा सुद्धा सहभाग आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले होते.(Air India Flight Accident: केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये 16 मृत्यू, 123 जखमी आणि 15 गंभीर जखमी; शोध व बचावकार्य पूर्ण)

दरम्यान, एयर इंडियाच्या आयएक्स 1344 (IX1344) विमानाने  दुबईहून उड्डाण घेतले होते. हे विमान करीपूर विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले व दरीत कोसळले. सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे रनवे वर पाणी साठले होते, अशात दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना कोझिकोड मेडिकल कॉलेज व इतर जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel