Konkan Railway: कोरोना विषाणू महामारीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक स्पेशल गाड्या झाल्या रद्द; या ठिकाणी पहा संपूर्ण List
Konkan Railway (PC - Instagram)

देशभरात सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे व ही लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. या साथीमुळे देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, सामान्य जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या महामारीचा रेल्वेच्या सेवांवरही (Indian Railway) परिणाम होत आहे. दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेने प्रवासी संख्येत घट झाल्याने काही गाड्या रद्द केल्या आहेत आणि आता कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरही काही विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कालपासून यातील काही गाड्या रद्द झाल्या व आजपासून काही गाड्या रद्द होत आहेत. पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने या गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच आरक्षण करावे.

पहा रद्द झालेल्या गाड्या –

    • निजामुद्दीन-मडगाव राजधानी सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक 30 एप्रिलपासून रद्द होईल.
    • मडगाव-निजामुद्दीन राजधानी द्वि-साप्ताहिक स्पेशल 2 मेपासून रद्द करण्यात येणार आहे.
    • करमाळी-मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट स्पेशल 28 एप्रिलपासून रद्द केली आहे.
    • मुंबई सीएसएमटी-करमाळी तेजस सुपरफास्ट स्पेशल 29 एप्रिलपासून रद्द करण्यात येणार आहे.
    • मंगरूरु सेंट्रल-लोकमान्य टिळक डेली सुपरफास्ट स्पेशल 29 एप्रिलपासून रद्द केली जाईल.
    • लोकमान्य टिळक-मंगलोर सेंट्रल डेली सुपरफास्ट स्पेशल 30 एप्रिलपासून तात्पुरती  थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    • मडगाव-मंगलोर सेंट्रल आरक्षित एक्सप्रेस स्पेशल 2 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे.
    • मंगळरुरू मध्य-मडगाव राखीव एक्स्प्रेस स्पेशल 2 एप्रिलपासून ट्रॅकवर धावणार नाही.

मध्य रेल्वेने 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये प्रवासी नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांची संपूर्ण यादी खाली पाहता येईल. (हेही वाचा: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?)

दक्षिण-मध्य रेल्वेनेही प्रवासी नसल्याने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, 07229 तिरुअनंतपुरम-सिकंदराबाद गाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पूर्वी ही ट्रेन तिरुवनंतपुरमहून सकाळी 7 वाजता सुटत होती, परंतु आता 28 एप्रिल ते 12 मे दरम्यान (रविवारी वगळता) सकाळी 09.30 वाजता सुटेल. याशिवाय दक्षिण मध्य रेल्वेने 26 एप्रिल ते 1 जून दरम्यान काही गाड्या रद्द केल्या आहेत.