Kohinoor Crown, Jagannath Puri Temple (wikimedia commons)

Bhubaneswar, Sep 12: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर कोहिनूर विषयी चर्चा सुरू झाली आहे. कोहिनूर परत भारतात आणण्याची मागणी सोशल मिडीयावर चांगलीच जोर धरत आहे.   भारतातील अनेकांनी आता कोहिनूर हिरा परत आणण्याची मागणी सुरू केली आहे. कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा असल्याचा दावा करून, ओडिशाच्या एका सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात ओडिशाच्या संस्थेने 12व्या शतकातील प्रसिद्ध पुरी मंदिरात कोहिनूर हिरा परत आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. 

ओडिशाच्या संस्थेच्या प्रिया दर्शन पटनायक यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा आहे, मात्र आता हा मौल्यवान हिरा ब्रिटन येथे आहे. जगन्नाथ सेनेने निवेदनात म्हंटले आहे की, महाराजा रणजित सिंग यांनी भगवान जगन्नाथ यांना स्वेच्छेने कोहिनूर हिरा दान केला होता.  दरम्यान, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर पुन्हा भारतात आणण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र कोहिनूर हिरा देण्यास ब्रिटनने नेहमीच स्पष्ट नकार दिला आहे. ”सेनेच्या संयोजक प्रिया दर्शन पट्टनायक यांनी निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या नादिरशहाविरुद्ध लढाई जिंकल्यानंतर पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी भगवान जगन्नाथ यांना हिरा दान केला होता, मात्र, हिरा तातडीने मंदिराकडे सोपवण्यात आला  नाही.

1839 मध्ये रणजित सिंग यांचा मृत्यू झाला आणि 10 वर्षांनंतर ब्रिटिशांनी रणजित सिंग यांचा मुलगा दुलीप सिंग यांच्याकडून  कोहिनूर हिरा काढून घेतला, परंतु भगवान जगन्नाथ यांना हा कोहिनूर देण्यात आला होता, असे इतिहासकार आणि संशोधक अनिल धीर यांनी पीटीआयला सांगितले. पटनाईक यांनी ठामपणे सांगितले की, त्यांनी राणीला या संदर्भात पत्र पाठवल्यानंतर, त्यांना बकिंगहॅम पॅलेसमधून 19 ऑक्टोबर 2016 रोजी एक संप्रेषण प्राप्त झाले होते, ज्यात त्यांना थेट युनायटेड किंगडम सरकारकडे आवाहन करण्यास सांगितले होते.कारण महामहिम त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार होते.  त्या पत्राची प्रत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनासोबत जोडण्यात आली  आहे, असे पटनाईक म्हणाले. सहा वर्षे या मुद्द्यावर गप्प का बसले, असे विचारले असता पटनाईक म्हणाले की, त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला होता, ज्यामुळे ते यूके सरकारकडे हे प्रकरण पुढे मांडू शकत नव्हते. “महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या मृत्यूपत्रात म्हटले आहे की, त्यांनी भगवान जगन्नाथ यांना कोहिनूर दान केला होता. हे दस्तऐवज एका ब्रिटीश आर्मी अधिकाऱ्याकडे होते, पत्राचा पुरावा दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध होता. लेखक आणि इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी त्यांच्या "कोहिनूर" या पुस्तकात नमूद केले आहे की, बाल शीख वारस दुलीप सिंग यांनी राणी व्हिक्टोरियाला दागिना भेट केल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. सुप्रीम कोर्टात भारत सरकारची भूमिका अशी होती की, अंदाजे 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा हा हिरा ब्रिटीश शासकांनी चोरला नाही किंवा "जबरदस्तीने" घेतला नाही तर पंजाबच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला दिला होता. 

जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक मानला जाणारा, कोहिनूर 14 व्या शतकात काकतिया राजवंशाच्या काळात दक्षिण भारतातील कोल्लूर येथे कोळसा खाणीत सापडला होता. कोहिनूर हिरा पुरुषांसाठी श्राप ठरतो असे म्हटले जाते, कोहिनूर ब्रिटीशांच्या हातात आल्यापासून फक्त महिलांनी तो परिधान केला आहे. राणी एलिझाबेथ II यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स महाराज बनले आहेत आणि नियमांनुसार, आता कोहिनूर हिरा त्यांची पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला यांच्याकडे जाईल.