कोरोना महामारीच्या दरम्यान लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक जणांच्या नोक-या गेले. अनेक उद्योगधंदे, कंपन्या बंद झाल्या. हॉटेल इंडस्ट्रीचे प्रचंड नुकसान झाले. छोटी-मोठी हॉटेल्स बंद पडली. असे असताना केफसी इंडिया (KFC India) रेस्टॉरन्ट एक धाडसी पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केएफसी आपल्या शाखांचे जाळे अजून विस्तारण्याच्या तयारीत आहे. भारतात आपल्या आणखी शाखा सुरु करण्याच्या केएफसी कंपनी तयारीत आहे. कंपनीच्या एका अधिका-याने याबाबत माहिती दिली असून लवकरच केएफसी आपला विस्तार वाढविणार आहे असे सांगितले आहे.
केएफसीने मागील वर्षी कोविड-19 महामारीच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटांमध्येही भारतात आपले 30 नव्या शाखा सुरु केल्या. याहीवर्षी कंपनी आपले अनेक आऊटलेट्स सुरु करण्याच्या तयारीत आहे.हेदेखील वाचा- Mann ki Baat: 'दवाई भी-कड़ाई भी' कोरोनाशी लढण्याचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा; 'मन की बात' कार्यक्रमाच्या 75 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहन
कंपनीचे म्हणणे आहे की, आम्ही ग्राहकांपर्यंत आपला ब्रांड अधिकाधिक पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कंपनी आपल्या व्याप आणखी वाढवत आहे.
केएफसी इंडियाचे प्रबंध निदेशक समीर मेनन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'आमचा मुख्य उद्देश आपला ब्रांड वाढविणे हाच आहे. आपला ब्रँड लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हाच आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपल्या ब्रँडचे विस्तार करत आहोत.' यामुळे भारतात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.