केरळमध्ये (Kerala) कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान डार्कनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography) कंटेंट शोधण्याच्या गुन्ह्यात 47 जणांना अटक करण्यात आली आहे. यात तरूणांचादेखील समावेश आहे. केरळ पोलिसांनी शनिवारी सांगितले की, 140 इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त करण्यात आले आहेत. राज्यात काउंटरिंग चाइल्ड लैंगिक शोषण संघाने डार्कनेटवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट शोधण्यात वेगाने वाढलेली घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळ पोलिसांकडून (Kerala Police) कठोर कारवाई करण्यात आली. सध्याच्या कायद्यानुसार मुलांच्या लैंगिक शोषणासाठी कंटेंट पाहणे, त्याचे वितरण आणि वस्तू ठेवणे हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याअंतर्गत 5 वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. (UN च्या अधिकाऱ्याचा भर रस्त्यात Car Sex करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल; संयुक्त राष्ट्र तर्फे तपास सुरु)
अप्पर पोलिस महासंचालक (एडीजीपी) मनोज अब्राहम यांनी सांगितले की, "राज्यात डार्कनेटवर ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट शोध वाढीच कळल्यानंतर सीसीएसई (काउंटरिंग चाइल्ड लैंगिक शोषण) पथकाने कारवाईस सुरुवात केली." शनिवारी पहाटे एकाच वेळी छापा टाकण्यात आला आणि अटक करण्यात आल्याची माहिती अब्राहम यांनी पीटीआयला दिली. मोबाइल फोन, मॉडेम, हार्ड ड्राइव्हस्, मेमरी कार्ड्स, लॅपटॉप्स आणि ग्राफिक व बेकायदेशीर व्हिडिओ असलेले संगणक व मुलांची छायाचित्रे असलेले संगणक जप्त केलेल्या उपकरणांचे वैज्ञानिक मूल्यांकन केल्यावर बर्याच जणांवर नजर ठेवली जात होती आणि अधिक अटक करण्यात आली.
Kerala police arrests 47 in online child pornography busts, 140 electronic devices seized: Official
— Press Trust of India (@PTI_News) June 27, 2020
"सर्वात त्रासदायक बाब म्हणजे अनेक व्हिडिओ/फोटो 6-15 वयोगटातील स्थानिक मुलांची असल्याचे दिसून आले," असे अब्राहमने सांगितले. पॉर्न ग्रुपमध्ये व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर कार्यरत अशाच प्रकारची प्रवृत्ती आढळून आली आणि कोविड-19 लॉकडाऊन कालावधीत अशा गटांची संख्या वाढली आहे, असे ते म्हणाले. सध्या कोल्लम, एर्नाकुलम, पलक्कड, तिरुअनंतपुरम आणि कोझिकोड, कन्नूर, अल्पुझा, कोट्टायम, पट्टानमथिट्टा, मल्लापुरम, थ्रीसुर, कासारगोड आणि वायनाड, इडुक्की येथून 47 जणांना अटक करण्यात आली आहे.