केरळ मध्ये 4 महिन्यांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यातील सर्वात कमी वयाचा बळी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

केरळ, 24 एप्रिल: कोरोना व्हायरस (Coronavirus)  मुळे केरळ (Kerala) मधील मल्लापुरम (Mallapuram) येथील एका 4  महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी या मुलीचा मृत्यू झाला त्याआधीच तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती, दुर्दैवाने ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळेच या मुलीचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मलप्पुरम जिल्हा वैद्यकीय अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, या मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून हृदयाशी संबंधित समस्येवर उपचार सुरू होते आणि तिला न्यूमोनिया देखील होता. शुक्रवारी सकाळी उपचाराच्या दरम्यान तिने प्राण सोडला. केरळ मधील हा मृत्यू सर्वात कमी वयाचा पहिला बळी ठरला आहे.कोरोना व्हायरसचे ताजे अपडेट जाणुन  घेण्यासाठी क्लिक करा. 

प्राप्त माहितीनुसार, या मुलीला प्रथम दम लागल्यामुळे 17 एप्रिल रोजी मांजेरीच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याच दिवशी मुलाला मांजेरीच्या दुसर्‍या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. कोझिकोडे मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर आज उपचार सुरु होते, या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, केरळ मध्ये भारतातील सर्वात प्रथम कोरोना रुग्ण आढळले होते. सद्य घडीला केरळ मध्ये 447 रुग्ण सापडले आहेत यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 372 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांचा आकडा आज 23 हजाराच्या पार गेला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात, 1684 प्रकरणे आणि 37 मृत्युंची नोंद झाली आहे, यानुसार आतापर्यंत कोरोनाचे 23,077 रुग्ण देशात आढळले आहेत