Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

केरळ विधानसभा निवडणूक 2021 (Kerala Assembly Elections 2021) प्रचार शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ काँग्रेस नेते, वायनाड येथील खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, राहुल गांधी यांनी आज (सोमवार, 22 मार्च) एका विद्यालयाला भेट दिली. येथे त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे धडेही दिले. राहुल यांनी या विद्यार्थ्यांना अकिडो (Aikido) बाबत काही माहिती आणि प्रात्यक्षीके शिकवली. महिला या पुरुषांपेक्षा अधिक सक्षम आणि ताकदवान असतात असे राहुल गांधी या वेळी म्हणाले. राहुल गांधी हे अनेकदा शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी सवाद साधताना दिसतात.

राहुल गांधी यांनी ज्या महाविद्यालयात Aikido शिकवले त्या महाविद्यालयाचे नाव सेंट टेरेसा कॉलेज कोच्ची असे आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यंना काके जपानी मार्शल आर्ट अथीकीडोचे काही स्टंट्स शिकवले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडेही दिले. तुम्ही जर अडचणीत असाल तर काय करायला पाहिजे हे सांगताना राहुल गांधी यांनी मार्शल आर्टचा एक स्टंट एका विद्यार्थ्याला शिकवला आणि इतरांना त्याच्याकडून शिकायला सांगितले. दरम्यान, राहुल गांधी हे या आधी आणखी एका विद्यालयात जोर काढतानाही दिसले होते. त्या वेळीही त्यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले होते. (हेही वाचा, Rahul Gandhi Push-Ups Challenge: 50 वर्षीय राहुल गांधी यांच्या फिटनेसची चर्चा; 9 सेकंदात मारले 14 पुश-अप्स (Watch Video))

दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कोलम समुद्रकिनारपट्टीवर समुद्रस्नानही केले होते. केरळमध्ये राहुल गांधी निवडणूक प्रचार करत आहेत. मंगळवारी त्यांनी पेरंबवू, पीरावम, पाला आणि कंजीरापल्ली येथे काही भागांचा दौरा केला.

केरळमध्ये काँग्रेस 140 जागांपैकी 91 जागांवर विधानसभा निवडणूक लढत आहे. राज्यात सहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी 2 मे या दिवशी होणार आहे.