Rahul Gandhi (Photo Credits ANI)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या निवडणूक प्रचारामध्ये पूर्ण जोमाने सहभागी आहेत. राहुल गांधी नेहमीप्रमाणेच जनतेमध्ये पूर्णपणे मिसळून हे अभियान राबवत आहेत. कधी ते मच्छीमारांसोबत मासे पकडत आहेत तर कधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींचे बायसेप्स व अ‍ॅब्स असलेले फोटोज व्हायरल झाले होते. आता त्यांच्या पुशअप्सचा (Push-Ups) व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या तामिळनाडूच्या दौर्‍यावर आहेत. सोमवारी ते कन्याकुमारीच्या मुलगुमूडुन येथील शाळेत दाखल झाले. जिथे त्यांनी मुलांशी संवाद साधला. दरम्यान, एका विद्यार्थ्याने त्यांना 15 पुशअप करण्याचे आव्हान केले, ते राहुल गांधींनी मान्य केले आणि 10 सेकंदात 14 पुशअप्स मारले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एएनआयच्या म्हणण्यानुसार, मुलगुमूडुन येथील सेंट जोसेफ मॅट्रिक हायस्कूलमध्ये ‘अकिडो’ (मॉर्डन जपानी मार्शल आर्ट) आणि विद्यार्थ्यांसह पुशअप मारून राहुल गांधी यांनी लोकांना आश्चर्यचकित केले. राहुल गांधींनी दोन्ही हातांनी नऊ सेकंदात 14 पुश-अप्स मारले त्यानंतर अजून थोडे अवघड काही करूया असे म्हणत, त्यांनी एका हातानेही पुश अप्स मारले. यासह त्यांनी मंचावर नृत्यही केले. इतर अनेक नेते आणि विद्यार्थी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. (हेही वाचा: RamRam Cheque: अयोध्या मधील भव्य राम मंदिरासाठी देणगीचा अनोखा चेक; 'रामराम' लिहित साकाराली दानाची किंमत (See Pic))

राहुल गांधी यांच्या या व्हिडीओवर अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, मिळनाडूमधील सर्व 234 जागांवर एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा होताच, निवडणूक राज्यांमध्येही आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विज्ञान भवन येथे निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी यांनाही मतदान करण्यासाठी 1 तास अधिक वेळ मिळेल. तमिळनाडूमध्ये ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम आणि भाजपा यांच्या युतीचा सामना द्रविड़ मुनेत्र कषगम (डीएमके) व कांग्रेसच्या युतीशी आहे.