केरळ विधानसभा निवडणूक 2021 (Kerala Assembly Election 2021) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 2 मे 2021 या दिवशी होणार आहे. केरळ विधानसभेसाठी 6 एप्रिल रोजीच मतमोजणी पार पडली आहे. दरम्यान, मतदानानंतर आणि मतमोजीपूर्वी काही संस्थांनी जनतेच्या मनात काय आहे याबबत चाचपणी केली आहे. या चाचपणीतून आलेले निष्कर्ष एक्झिट पोल्सच्या (Exit Polls Results 2021)रुपात जाहीर केले जातात. या पोल्सबाबत (Exit Polls) राजकीय वर्तुळासह अनेकांना उत्सुकता असते. केरळ विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स (Kerala Assembly Election 2021 Exit Polls Results) अंदाज नेमके काय आहे याबाबत तुम्हाला इथे माहिती मिळू शकते.
केरळ विधानसभआ निवडणुकीत एकूण 140 जागांसाठी 957 उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी लेफ्ट टेमोक्रेटिक फ्रंड (LDF) , विरोधात असलेली काँग्रेस, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आणि भाजप आदी पक्षांनी निवडणुकीत जोरदार प्रचार केला. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह, विरोधकांनी रमेश चेन्नीतला आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांच्यासह 957 उमेदवारांनी आपले जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
एक्झिट पोल्स निकाल
1) टाइम्स नाउ-सी वोटर सर्वे
एलडीएफ- 74
यूडीएफ- 65
भाजप- 1
2) रिपब्लिक
एलडीएफ- 72-80
यूडीएफ-58-64
भाजप- 1-05
3) इंडिया टुडे -
एलडीएफ- 104-120
यूडीएफ-20-36
भाजप- 0-02
इतर - 02
3) एबीपी न्यूज -
एलडीएफ- 71-77
यूडीएफ-62-68
भाजप- 0-02
3) न्यूज 24 -
एलडीएफ- 102
यूडीएफ- 35
भाजप- 3
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी कोरोना नियमांचे पालन करत 40,771 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार केरळमध्ये 1,32,83,724 पुरुष तर 1,41,62,025 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. 290 ड्रान्सजेंडर मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला. केरळ विधानसभेत गेली अनेक वर्षे डाव्या पक्षांची सत्ता आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही डावे पक्षच केरळमध्ये बाजी मारणार की काही सत्तापालट होणार याबाबत उत्सुकता आहे. एक्जिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल याबाबतही तितकीच उत्सुकता आहे.