Karnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
BS Yediyurappa | (Photo Credit : Facebook)

Karnataka: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने गळफास लावून आत्महता केल्याची घटना समोर आली आहे. तर तिचा मृतदेह हा बंगळुरुतील एका खासगी अपार्टमेंटमध्ये आढळला आहे. परंतु तिने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीएस येदियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या विधानानुसार, बॉरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

सौंदर्या हिने गळफास लावल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सौंदर्या ही पेशाने डॉक्टर होती आणि सेंट्रल बंगळुरु येथील आपल्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिला एक चार वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. सुत्रांनी असे म्हटले की, प्रेग्नंसीनंतर ती तणावात असल्याचे दिसून आले होते. तर सौंदर्या ही येदियुरप्पा यांची सर्वात लहान मुलगी पद्मा यांची मुलगी आहे. प्राथमिक रिपोर्ट्समध्ये ती बंगळुरुतील आपल्या घरी मृतावस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले आहे.(Bhaiyyu Maharaj Suicide Case: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3 दोषींना 6 वर्षांची शिक्षा; इंदूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय)

Tweet:

सौंदर्या हिचा 2019 मध्ये डॉ.नीरज याच्या सोबत विवाह झाला होता. ही घटना सकाळी 10 वाजताची असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा घरातील नोकराने रुमचा दरवाजा ठोठावला असता तेव्हा आतमधून काही उत्तर आले नाही. तेव्हा त्याने लगेच नीरज याला फोन केला. नीरज याने रुमचा दरवाजा उघडला असता तिने पंख्याला लटकून गळफास लावला होता. प्रथमदृष्ट्या असे कळते की, तिने आत्महत्या केली आहे.