Death (Photo Credits-Facebook)

Karnataka Shocker: चुलत भावासोबत अफेअर असल्याचे लपवण्यासाठी कर्नाटकातील एका मुलीने आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घचना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी शैलजा आणि पुनीत अशी आरोपींची नावे आहेत.(Jaipur: PUBG खेळण्यासाठी आई-वडिलांनी वाढदिवसाला घेतला नाही नवा मोबाइल, 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या)

सवित्राम्मा (46) यांचा त्या दोघांच्या नात्यावर आक्षेप होता. त्यामुळेच त्या दोघांनी त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह पाण्याच्या डब्यात टाकला. पण जेव्हा सवित्राम्मा यांना रिलेशनशिपबद्दल कळले असता त्यांनी त्या दोघांना त्यांचे नाते संपवण्यास सांगितले. तसेच दोघांनी एकमेकांना फोनवरुन संपर्क किंवा मेसेज करु नये असे ही सांगितले होते.(Crime: सुरतमध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाकडून बहिणीवर विळ्याने वार, आरोपी ताब्यात)

परंतु तरीही आरोपींना दोघांचे रिलेशनशिप सुरु ठेवले. मात्र काही दिवसांनी सवित्राम्माच्या हत्येचा कट रचला गेला.तर 30 जानेवारीला तिची आरोपींनी हत्या केली. परंतु त्यांनी सावित्राम्माची अशा पद्धतीने हत्या केली की तो एक अपघात घडला आहे. परंतु सुरुवातीला सुद्धा पोलिसांकडून या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र अधिक तपास केला असता खरे सत्य उघडकीस आले. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे.