
Jaipur: राजस्थानच्या जयपूरमध्ये एका 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. वाढदिवसानिमित्त तिला PUBG खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्याने शुक्रवारी राजधानीच्या सोडाळा परिसरात मुलीने गळफास लावून घेतला.
जयपूरचे पोलीस अधीक्षक राज कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, “12 वीत शिकणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीने 13 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने PUBG खेळण्यासाठी तिच्या पालकांकडे मोबाईल फोन मागितला. मात्र, पालकांनी तिला नवीन फोन बारावीची परीक्षा संपल्यानंतर घेऊ असं सांगितलं."
गुप्ता म्हणाले की, असं म्हटलं जात आहे की, या गोष्टीमुळे मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. (वाचा - Hijab Row: हिजाब घालणे इस्लाम धर्मात अनिवार्य नाही, कर्नाटक हायकोर्टात सरकारने मांडली बाजू)
काही दिवसांपूर्वी जयपूरमधील रामनगर मेट्रो स्टेशनच्या रेलिंगवरून 30 वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या भारती नावाच्या मुलीने शुक्रवारी रात्री मेट्रो स्टेशनच्या रेलिंगवरून खाली उडी मारली. गंभीर अवस्थेत तिला एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.