MP Prajwal Revanna

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते.  असे असले तरी लोकसभा निवडणूकीत प्रज्वल रेवन्नाला सुरुवातीला मतांची आघाडी पहायला मिळात मात्र त्यानंतर त्याची पिछाडी पहायला मिळाली होती.  प्रज्वल्ल विरोधात असलेल्या कांग्रेस पक्षाचे श्रेयस पटेल यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केला आहे.  (हेही वाचा -  Lok Sabha Election Results 2024 Live Updates: नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे 1 लाख 47 हजार मतांनी पुढे)

या प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना यांना जेडीएस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. हसन मतदारसंघात प्रज्वल रेवन्ना पराभव झाला आहे. महिलांकडून लैंगिक छळाचे आरोप होताच प्रज्वल रेवन्ना जर्मनीला निघून गेले. सुमारे महिनाभर प्रज्वल रेवन्ना जर्मनीमध्ये होते. मात्र, अखेरीस 35 दिवसांनंतर प्रज्वल रेवन्ना भारतात परत आले. बंगळुरू विमानतळावर उतरताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, कर्नाटकात भाजपा आणि जेडीएस युतीत लोकसभा निवडणूक लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्वल रेवन्ना यांच्यासाठी प्रचारसभाही घेतली होती. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांचे प्रकरण समोर आले.