Lok Sabha Election Results 2024 Live Updates: लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत; पहा थेट प्रक्षेपण
महाराष्ट्र
टीम लेटेस्टली
|
Jun 04, 2024 08:51 PM IST
लोकसभा निवडणूकीच्या 543 जागांचे निकाल (Lok Sabha Election Results) आज लागणार आहेत. 18व्या लोकसभेमध्ये कोण खासदार म्हणून निवडले जाणार यासाठी जनतेने दिलेल्या मताचा कौल आज समजणार आहे. एक्झिट पोलच्या (Exit Poll) अंदाजानुसार, नरेंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एनडीए सत्तेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसर्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा एनडीए (NDA) विरूद्ध इंडिया अलायंस (India Alliance) झालेल्या निवडणूकीमध्ये कोणाच्या परड्यात कोणत्या जागा पडणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
यंदाच्या वर्षी 80 वर्षावरील नागरिकांना घरातूनच मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला होता त्यामुळे आधी पोस्टल मतं मोजणी आणि नंतर नियमित मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. भाजपाचं अबकी बार चारसो पार हा नारा सत्यात उतरणार का? हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे.
महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती या संघर्षामध्ये कोण बाजी मारणार याचीही जनतेला उत्सुकता आहे. राज्यात झालेल्या पक्ष फोडीच्या राजकारणानंतर जनता कुणाच्या बाजूने उभी राहते याची देखील मोठी उत्सुकता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात ही अटीतटीची लढाई असणार आहे.