कर्नाटक राज्यातील उडपी येथे दोन गटात तुंबळ राडा (PC - X/@NDTV)

Karnataka: कर्नाटक राज्यातील उडुपी (Udupi)येथे दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात एक जण गंभीर तर इतर काही जण जखमी झाले आहेत. ही घटना 18 मे रोजी रात्री घडली. काळजाचा थरकाप उडेल अशी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याच घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. आमच्या वाचक आणि दर्शकांसाठी सूचना अशी की, हा व्हिडिओ आपणांस विचलित करू शकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भांडणात सहा जणांचा सहभाग होता. दोघांना अटक करण्यात आली आहे, तर चार जण फरार आहेत. आर्थिक कारणावरून झालेल्या मतभेदातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन गटांमध्ये झालेला हिंसक संघर्ष जवळच्या एका उंच इमारतीतील रहिवाशाने मोबाईल कॅमेऱ्याने टिपला. ज्यामुळे ही घटना व्हिडिओमध्ये उपलब्ध झाली.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन मारुती स्विफ्ट कार घटनास्थळी दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक कार अतिवेगाने धावताना आणि दुसऱ्याच्या बोनटला धडकून काळा धूर सोडताना दिसते आहे आहे. दोन्ही वाहनांतील पुरुष कर एकमेकांना धडकल्यानंतर नंतर बाहेर पडले आणि शारीरिक हिंसेसाठी प्रवृत्त झाले. (हेही वाचा -Rajastan Accident Video: रस्ता ओंलाडताना भरधाव कारची धडक, तरुण गंभीर जखमी, घटना CCTV कैद (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

दोन्ही गटातील हिंसक संघर्ष इतका टोकाचा आहे की, हे तरुण एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. व्हिडिओत पाहायला मिळते की, दोन्ही गटातील तरुणाकडे धारधार शास्त्रे आहेत. दोन्ही बाजूंनी शस्त्रे परजित परस्परांवर चाल केली जात आहे. दरम्यान, पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट कार अत्यंत बेदरकार पणे चालवली जात आहे. या करचा चालक इतका आक्रमक झाला आहे की, समोरच्या गटातील जो कोणी आढवा येईल, किंवा दिसेल त्याला तो करणे चिरडत निघाला आहे. करची ठोकर बसून एक व्यक्ती तर जागेवरच कोसळतो. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झालेली आहे.