Voting | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Karnataka Assembly Elections Polling Today: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Elections 2023) साठी उद्या म्हणजेच 10 मे रोजी मतदान पार पढते आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी एकूण 224 जागांसाठी ही निवडणूक पार पडते आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 29 मार्च रोजी जाहीर केलेल्या या निवडणूक कार्यक्रमानुसार ही निवडणूक पार पडते आहे. या कार्यक्रमानुसार कर्नाटक राज्यातील 58,545 मतदान केंद्रांवर एकूण 5,31,33,054 मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. पात्र उमेदवारांपैकी किती मतदार मतदानाचा अधिकार बजावतात याबाबत उत्सुकता आहे. या मतदानावरच उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात (EVM) मध्ये कैद होणार आहे.

कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांसाठी राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांसह विविध संघटना आणि अपक्षांसह 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांपैक 2,430 पुरुष, 184 महिला आणि एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे.तर, एकूण 5,31,33,054 मतदारांपैक 2,67,28,053 पुरुष, 2,64,00,074 महिला आणि 4,927 इतर श्रेणीतील मतदार आहेत. तर उमेदवारांमध्ये 2,430 पुरुष, 184 महिला आणि एक तृतीय लिंगाचा आहे. (हेही वाचा, Mallikarjun Kharge आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा भाजपचा डाव; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप)

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी असणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण मतदारांपैकी तरुण मतदारांची संख्या 11,71,558 इतकी आहे. तर 5,71,281 दिव्यांग (PWDs) आहेत. वयाची 80 वर्षे पार केलेल्या मतदारांची संख्या 12,15,920 इतकी आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सुमारे चार लाख मतदान कर्मचारी या प्रक्रियेत गुंतले आहेत.