Amulya Leona (Photo Credits: ANI)

AIMIM चीफ असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या सभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणारी मुलगी अमूल्या लियोना (Amulya Leona) हिला बंगळुरुच्या एका न्यायालयातून काल रात्री जामीन मिळाला. अमूल्याने 20 फेब्रुवारी रोजी सीएए-एनआरसी विरोधी रॅलीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर वादाला तोंड फुटले. त्यानंतर पोलिसांनी अमूल्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करत तिला अटक केले होते. (असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या अमूल्या लियोना हिला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी)

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत अमुल्या लियोना हिला सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नावाच्या संस्थेकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यात तिने 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तिला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ती घोषणा देतच राहिली. अखेर पोलिसांनी तिला मंचावरुन हकलून लावले. त्यानंतर अमूल्याशी माझा आणि माझ्या पक्षाचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून देण्यात आले.

ANI Tweet:

सीएए-एनआरसी या वादांवरुन संपूर्ण देश पेटलेला असताना अमूल्या हिने पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केली होती. या कायद्याला दिल्ली, मुंबई, कोलकाता, आसाम, कर्नाटक समवेत दुसऱ्या राज्यांमध्ये देखील विरोध केला जात होता. यावरुन सर्वत्र आंदोलने सुरु होती आणि मोदी सरकारने सीएए-एनआरसी विषयक निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होत होती.