Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

जॉनसन अॅन्ड जॉनसनने आपल्या सिंगल शॉट लसीच्या आपत्काली वापरासाठी भारत सरकारने मंजूरी देण्याची मागणी कंपनीने केली आहे. कंपनीने सोमवारी असे म्हटले होते की, ती भारतात आपली सिंगल डोस असणारी कोविड लस घेऊन येण्यास प्रतिबद्ध आहे. तसेच या संबंधित भारत सरकार सोबत सुरु असलेल्या चर्चेबद्दल अपेक्षा व्यक्त केली आहे.(Covid-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 44,643 नवे कोरोना रूग्ण; 464 मृत्यू)

कंपनीच्या प्रवक्त्यांनी एका विधानात असे म्हटले आहे की, जॉनसन अॅन्ड जॉनसन प्रायव्हेट लिमिटेडने 5 ऑगस्ट 2021 रोजी भारत सरकारला आपली सिंगल डोस असणारी कोविड19 च्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी अर्ज केला आहे. विधानात असे ही म्हटले आहे की, ही एक महत्वपूर्ण लस असून जी बायोलॉजिकल ई लिमिटेडसह कंपनी सोबत भारतातील लोक आणि अन्य जगातील कोविड लसीच्या एकच डोसचा ऑप्शन देते.(Covishield Vaccine: पुन्हा एकदा बदलू शकते 'कोव्हिशील्ड' लसीच्या दोन डोसमधील अंतर; 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी घेतला जाऊ शकतो निर्णय- NK Arora)

नुकत्याच आरोग्य मंत्रालयाने सुद्धा जॉनसन अॅन्ड जॉनसच्या लसीबद्दक विधान केले होते. नीति आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. वीके पॉल यांनी असे म्हटले होते की, जॉनसन अॅन्ड जॉनसच्या लसीचे उत्पादन बाहेर होत आहे. भारत सरकारच्या प्लॅननुसा या लसीचे उत्पादन हैदराबाद मधील बायो ई मध्ये सुद्धा केले जाईल. सध्या देशात 4 कोरोनाच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. ज्यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक वी आणि मॉर्डना यांचा समावेश आहे. जॉनसन अॅन्ड जॉनसनला जर मंजूरी मिळाली तर ही भारतातील चौथी लस असणार आहे. दरम्यान, सिंगल शॉच असणारी ही भारतातील पहिलीच लस असणार आहे.