JNU Violence: चेहरा झाकून हिंसाचार करणाऱ्या मॉबमधील 'त्या' मुलीची ओळख अखेर पटली
JNU Violence (Photo Credits: Twitter)

JNU Violence: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 5 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एका व्हिडिओतून तोंडाला फडकं बांधून असलेली एक मुलगी ओळखली आहे. ही मुलगी जेएनयूच्या पेरियार हॉस्टेलमध्ये हिंसाचार करणाऱ्या मॉबचा भाग होती. या मुलीच्या हातात काठी आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता तर चेक्सचा एक शर्ट तिने परिधान केला होता.

ती दिल्ली युनिव्हर्सिटी (डीयू) च्या दौलत राम कॉलेजची विद्यार्थिनी आहे. दिल्ली पोलिस लवकरच तिला नोटीस बजावणार आहेत. न्यूज एजन्सी एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "एसआयटी टीमने ओळखले आहे की जेएनयू हिंसाचाराच्या व्हिडिओंमध्ये दिसलेली मुखवटा घातलेली मुलगी ही दिल्ली विद्यापीठातील आहे. तिला लवकरच चौकशीसाठी हजार राहण्याची नोटीस पाठवण्यात येणार आहे."

5 जानेवारी रोजी संध्याकाळी एक मुखवटा घातलेला जमाव लाठी व लोखंडी रॉड घेऊन जेएनयू कॅम्पसमध्ये घुसला आणि जमावातील लोकांनी विद्यार्थी व शिक्षकांवर हल्ला केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेश केला आणि कॅम्पसच्या मालमत्तेची तोडफोड केली. जेएनयूएसयूचे अध्यक्ष आईशी घोष, जेएनयूएसयूचे सरचिटणीस सतीश चंद्र यांच्यासह शिक्षकांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. आईशी घोष हिच्यासह 30 हून अधिक विद्यार्थ्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले.

पीएम नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी; ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजप कार्यालयात प्रकाशन

दरम्यान, जेएनयू प्रकरणात गुन्हे शाखेने नोटीस बजावलेल्या नऊ विद्यार्थ्यांची सोमवारी चौकशी केली जाणार आहे. जर गुन्हे शाखेचे अधिकारी सहमत झाले तर जेएनयू कॅम्पसमध्ये चौकशी केली जाईल. गुन्हे शाखेच्या पथकाने कॅम्पसच्या आत आपले कँप कार्यालय सुरू केले आहे.