Jio Fiber Down: जिओ फायबर सेवा अचानक डाऊन, युजर्सना इंटरनेट वापरताना अडचणी
Jio Fiber | File Image

Jio Fiber Down: रिलायंस जियो फायबर सर्वर अचानक डाऊन झाल्याने देशभरातील अनेक युजर्सना बुधवारी (28 डिसेंबर) अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रिलयन्स जिओ युजर्सनी ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर जीओ व्यवस्थापनाने तातडीने दखल घेतली. देशभरातूनच सर्वर डाऊनची समस्या असल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. रिलायन्सच्या आयटी टीमने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नानंतर ही सेवा पुर्ववत झाली.

सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स जिओ युजर्सना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. प्रामुख्याने अनेकांना जिओ इंटरनेट सर्व्हिसेस ट्रॅकर डाउनडिटेक्टरने जिओच्या ब्रॉडबँड आणि इंटरनेट वापरताना अनेक युजर्सनी तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान, Jio ब्रॉडबँड सेवा सकाळी 11:30 वाजता पुन्हा सुरू झाल्या, कारण कंपनीने सर्व्हर समस्येचे निराकरण केले ज्यामुळे देशभरातील सेवांवर परिणाम होत होता. (हेही वाचा, Jio Fiber च्या 'या' 4 प्लॅनमध्ये 15 ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन)

युजर्स ट्विट

युजर्स ट्विट

दरम्यान, Downdetector च्या लाइव्ह आउटेज मॅपनुसारचा हवाला देत एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चंदीगड, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नईसह इतरही अनेक शहरांवर Jio आउटेजच्या समस्या पाहायला मिळत आहेत. जिओचे नेटवर्क डाऊन झाल्यामुळे ट्विटरवर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. काहींनी इंटरनेट सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली तर काहींनी म्हटले की, नेटवर्क डाऊन झाल्याने त्यांना जीओच्या ग्राहक सेवांमध्ये प्रवेश करता येत नाही.