Jharkhand: हुंडा दिला नाही म्हणून बायकोला जिवंत जाळल्यानंतर नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी काढला पळ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Jharkhand:  हजारीबाग शहरात 24 वर्षीय एका महिलेला तिच्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी हुंडा दिला नाही म्हणून कथित रुपात जाळल्याची घटना समोर आली आहे. पोलीस अधिकारी नजीर अख्तीर यांनी असे म्हटले की, मृत महिलेच्या भावाने दिलेल्या जबाबावरुन या घटनेसंबंधित एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना या घटनेसंबंधित कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे त्यांना बसंती देवी नावाच्या या महिलेच्या जळालेल्या शरीराचे अवशेष मिळाले.(लहान मुलांना असेच वाऱ्यावर सोडून देण्यात दिल्ली अव्वल; महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा ही समावेश-NCRB)

नजीर अख्तर याने असे सांगितले की, पोलीस घटनास्थळी आल्यानंतर नवरा अंगद साव आणि परिवारातील मंडळी त्यांच्या 8 आणि 3 वर्षाच्या मुलांसह पळ काढला. पोलिसांना घटनास्थली अंगदचा नातेवाईक निर्मल साव हा घरातच होता. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Delhi: तिहार कारागृहात गेल्या 8 दिवसात पाच कैद्यांचा मृत्यू)

पोलीस अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, महिलेच्या शवाचे अवशेष हे शवविच्छेदनासाठी हजारीबाग मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. बसंती देवी हिच्या भावाने असे म्हटले की, तिच्या सासरच्या मंडलळींना पैसे आणि दुचाकी हवी असल्याने ते तिला त्रास देत होते. या व्यतिरिक्त सासरच्या मंडळींना आधी काही प्रमाणात हुंडा सुद्धा दिला होता. परंतु त्यांच्या मागण्या अधिक वाढू लागल्या होत्या.