Delhi: दिल्लीतील तिहार कारागृहात गेल्या 8 दिवसात 5 कैद्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. परंतु कारागृहाच्या प्रशासनाने याला नैसर्गिक मृत्यू (Natural Death) असे म्हटले आहे. त्याचसोबत सर्व प्रकरणाची कलम 176 सीआरपीसी अंतर्गत दंडाधिकारी तपास सुरु आहे. कारागृहाच्या सुत्रांच्या मते, शुक्रवारी विक्रम उर्फ विक्की नावाच्या अंडरट्रायल कैद्याचा मृत्यू झाला. तो कारागृह क्रमांक 3 मध्ये बंद होता. या संदर्भात कारागृहाच्या प्रशासनाने म्हटले की, विक्की याची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.
तर दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, विक्की याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. मृत्यूमागील कारणाचा खुलासा शवविच्छेदनानंतर होईल. तर पोलिसांनी गेल्या 8 दिवसात 5 कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.(IT Raid at Businessman Piyush Jain's Home: रोख 150 कोटी रुपयांचे घबाड, 8 यंत्रांद्वारे 24 तास नोटा मोजण्याचे काम सुरुच; कानपूर येथील परफ्यूम उद्योजकाच्या घरावर आयटीचा छापा)
दिल्लीतील तिहार कारागृह हे सर्वाधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त जेल असल्याचे मानले जाते. परंतु गेल्या आठ दिवसात झालेल्या कैद्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तर कैद्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे होतोय या संदर्भात कारागृहाच्या प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे कारण थंडी असल्याचे ही सांगितले जात आहे. सध्या कारागृहाच्या प्रशासनाकडून कैद्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.(POCSO Court: भिंन्नलिंगी मैत्रीण म्हणजे लैंगिक इच्छापूर्तीची उपलब्धी नव्हे- पॉक्सो कोर्ट)
तिहारमध्ये एक कैद्यावर अन्य दोन कैद्यांनी आपल्या वॉर्डात केस कापतेवेळी कथित रुपात कैचीने हल्ला केला होता. कारागृहाच्या अधिकाऱ्यांच्या मते ही घटना 10 डिसेंबरला घडली. यामध्ये पीडित आणि एक हल्लेखोर जखमी झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डिस्चार्ज दिला गेला.