Jharkhand Vidhan Sabha Election 2019 Results Live News Updates: झारखंडमध्ये झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी आघाडीचा दणदणीत विजय; 45 जागांसह बहुमताचा आकडा पार
बातम्या
Siddhi Shinde
|
Dec 23, 2019 10:50 PM IST
झारखंड विधानसभा निवडणूकीचा (Jharkhand Vidhansabha Election Results) निकाल आज, 23 डिसेंबर रोजी लागणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावेळी पोस्टल बॅलेट तर्फे नोंदवण्यात आलेल्या मतांची मोजणी पहिल्यांदा होणार असून त्यानंतर ईव्हीएम (EVM) द्वारे नोंदल्या गेलेल्या मतांची मोजणी होईल. झारखंड विधानसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच माध्यमातर्फे एग्झिट पोल जाहीर करण्यात आला होता, यातील एबीपी न्यूज सी वोटर सर्वेमध्ये महागठबंधन सत्तेत बाजी मारण्याची शक्यता वर्तवली आहे. एबीपी न्यूज सी वोटर सर्वेनुसार महागटबंधनला 13-39 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर,भाजपला 28-36 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
यंदा मुख्य निवडणूक आयोगाच्या तर्फे 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पूर्ण 81 विधानसभा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी झारखंड मधील सद्य विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि राष्ट्रीय जनता दल यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर केली होती, यानुसार, JMM तर्फे 43 जागांवर तर काँग्रेस (Congress) तर्फे 31 आणि आरजेडी (RJD) तर्फे 7 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपला 37 तर आजसूला 5 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विधानसभेत 41 हा बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी भाजपला आजसूची मदत घ्यावी लागली. दरम्यान, आपले बहुमत अधिक बळकट करण्यासाठी भाजपने पुढे झारखंड विकास मोर्चाच्या 6 आमदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन सरुकार स्थापन केले होते.यंदा भाजप विरुद्ध महागठबंधन निवडणूक निकालात जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहण्यासाठे लेटेस्टली मराठी वर पहा क्षणोखसणीचे लाईव्ह अपडेट्स..