झारखंड येथे शाळेत प्रसाद खाल्ल्याने 40 विद्यार्थ्यांना विषबाधा
झारखंड येथे शाळेत प्रसाद खाल्ल्याने 40 विद्यार्थ्यांना विषबाधा (फोटो सौजन्य-ANI)

झारखंड (Jharkhand)  येथे एका शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रसाद खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 40 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लोहार्डगा जिल्हायातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रसादाच्या माध्यमातून विषबाधा झाल्याचे डॉ. एस. एस. खालिद यांनी सांगितले आहे. तर आतापर्यंत रुग्णालयात 40 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यामधील एक दोन जणांनी प्रकृती गंभीर असल्याचे ही डॉक्टरांनी सांगितले आहे. तर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी रतन महावर यांनी या प्रकरणी तातडीने तपास करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपीवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे महावर यांनी म्हटले आहे. प्रसादामधून झालेल्या विषबाधेसाठी ते चाचणीकरता पाठवण्यात येणार आहेत.

तसेच कर्नाटक येथे सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली. त्यामध्ये 15 भाविकांनी देवळातील प्रसाद खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्ह्याचे मंत्री पुतरंगा शेट्टी यांनी दोन आरोपींना अटक केली होती.