प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Jet Airways Resumption:  जेट एअरवेज (Jet Airways) आता 2022 पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू होण्यास सज्ज झाली आहे. नव्या वर्षात पहिल्या टप्प्यामध्ये डोमॅस्टिक (Domestic) आणि नंतर मर्यादित स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानसेवा (International Flights) सुरू होणार आहे. यामध्ये पहिलं उड्डाण दिल्ली -मुंबई मार्गावर होणार आहे. एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेज डबघईला गेल्याने बंद पडली होती. bankruptcy laws मुळे अडचणीत आलेली जेट एअरवेज ही पहिली भारतीय कॅरिअर आहे जी पुन्हा सुरू होत आहे. नव्या रूपात जेट एअरवेज त्याचा बेस मुंबई (Mumbai) ऐवजी दिल्ली एनसीआर (Delhi NCR) मध्ये हलवणार आहे.

दरम्यान 2022 च्या पहिल्या तिमाही देशांतर्गत सेवा सुरू केल्यानंतर तिसर्‍या, चौथ्या तिमाहीमध्ये काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरही विमानसेवा सुरू करण्याचा जेट एअरवेजचा विचार आहे. Jet Airways च्या 500 कर्मचाऱ्यांना SpiceJet ने दिली नोकरी; 27 नवीन विमाने घेऊन मार्ग वाढवण्याचा मानस.

Jalan Kalrock Consortium कडून जेट एअरवेज 2.0 बद्दल देण्यात आलेल्या माहितीनुसार, National Company Law Tribunal कडून जेट एअवेजला जून 2021 मध्ये परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर इतर यंत्रणांकडूनही आवश्यक कागदपत्रांची, परवानग्यांची जुळवाजूळव सुरू झाली आहे.

जेट एअरवेज कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 150 पेक्षा अधिक लोकांना सेवेमध्ये घेतलं आहे. आता 1000 पेक्षा अधिक लोकांना घेण्याचा विचार आहे. एअरलाईनच्या ऑपरेशनल रिक्वायमेंट साठी मेरीटवरच उमेदवार निवडले जाणार आहेत. तसेच ही नोकरभरती देखील ट्प्प्या टपप्याने केली जाईल.