जेट एअरवेज (Jet Airways) कंपनी ही गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे. तसेच 17 एप्रिल रोजी जेटच्या विमानाने शेवटचे उड्डाण केले होते. मात्र त्यानंतर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत त्यांच्या थकीत वेतनाची मागणीसुद्धा केली.
मात्र आता जेट एअरवेज कंपनीला हिंदुजा ग्रुप विकत घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पुढील आठवड्यात बोली लावली जाणार आहे. या बोलीसाठी नरेश गोयल आणि गुंतवणूकदार कंपनी एतिहाद एअरवेज यांची संमती घेतली आहे.तत्पूर्वी जेट एअरवेज यांनी अनेक कंपन्यांकडे सुद्धा आर्थिक संकटातून वर येण्यासाठी काही बँकांकडे मदत मागितली होती. परंतु बँकांनीसुद्धा त्यांना मदत करण्यास नकार दिला. त्यामध्येच कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन आणि बरोजगार होण्याची वेळ आली आहे.(जेट एअरवेज बंद झाल्याचा आंबा निर्यातीवर फटका, अन्य विमान कंपन्यांचे कार्गोचे दर महागल्याने आंब्यांची निर्यात झाली कमी)
परंतु आता जीपी हिंदुजा आणि अशोक हिंदुजा यांनी संबंधीत बँकांशी याबद्दल चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल आणि हिंदुजा बंधुंमध्ये खुप जुने संबंध आहेत. त्यामुळे जेट एअरवेजला या व्यवहाराचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे.