Greta Thunberg (photo Credits: File Image)

कोरोना संकटामुळे (Coronavirus Pandemic) नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडुन होत असताना परिक्षा ठरलेल्या वेळेतच घेण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार ठाम आहे. या वरुन भारतीय विद्यार्थ्यांना पाठिंंबा देत स्वीडन च्या 17 वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg)  एक संतप्त ट्विट केलंं आहे, भारत सरकारने या कोरोना काळात विद्यार्थ्यांना परिक्षेची सक्ती करणे हे अत्यंत चुकीचे आणि अन्यायकारक असल्याचे ग्रेटाने आपल्या ट्विट मध्ये म्हंंटले आहे, भारतात केवळ कोरोनाच नाही तर अनेक भागात पुरामुळे सुद्धा लोक संंकटात अडकुन पडले आहेत अशावेळी सरकारने विचार करुन परिक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी ग्रेटाने सुद्धा मागणी केली आहे.

NEET 2020 & JEE Main Date and Schedule: नीट आणि जेईई एग्जामला स्थगिती नाही, ठरलेल्या वेळीच होणार परीक्षा-रिपोर्ट

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आलं आहे. जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान तर जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार असल्याचे लेटेस्ट अपडेट आहेत,ज्या निर्णयाला अनेक स्तरातुन विरोध केला जात आहे.

ग्रेटा थनबर्ग ट्विट

दरम्यान, केंद्र सरकारच्या परिक्षा वेळेतच घेण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानेच हिरवा कंंदील दाखवल्याने कायदेशीर अडथळे दुर झाले आहेत ,मात्र देशभरातील विविध विद्यार्थी संस्था या निर्णयाच्या विरोधात आहेत. अलिकडेच महाराष्ट्र पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा यासंदर्भात मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना लिहिले होते तर.पश्चिम बंंगालच्या मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा याच आशयाची मागणी केंद्र सरकार कडे केली आहे.