Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

आयआयटी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा (NEET) आयोजनाबद्दल उद्भवणाऱ्या प्रश्नांना आता पूर्णविराम लागले आहे. नीट आणि जेईई परीक्षा त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. Bar & Bench बेवसाईट्स यांच्यानुसार केंद्रीय एज्युकेशन सेक्रेटरी अमित खरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरे यांनी असे म्हटले आहे की, परीक्षा रद्द होणार नाही आहेत. खरंतर विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा घेण्यासारखी नाही आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सुद्धा काही नेते पुढे आले होते. त्यांनी असे म्हटले होते की, जेईई आणि नीट परीक्षा स्थगित करण्यात यावी.

विद्यार्थ्यांना समर्थन देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशि थरुर यांनी सुद्धा जेईई आणि नीटची परीक्षा स्थगिक करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. तर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीट आणि जेईई परीक्षा दिवाळी पर्यंत स्थगित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाला निर्देशन देण्याची मागणी केली होती.(Salaried Job Cuts: कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये एप्रिल पासून 1.89 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या; जुलैमध्ये 50 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या – CMIE)

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोरोना व्हायरच्या परिस्थितीचा हवाला गेत दोन्ही प्रवेश परीक्षा स्थघित करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले होते की, व्हायरसची परिस्थिती असली तरीही आयुष्य सुरुच आहे. सप्टेंबर महिन्यात नॅशनल टेस्टिंग एजेंसीच्या निर्णयात दखल देत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालू शकत नाही.

तर कोरोना व्हयरसमुळे नीट आणि जेईई मेन परीक्षा दोन वेळेस स्थगित करण्यात आली आहे. पहिल्यांदा ही परीक्षा मे महिन्यात होणार होती. मात्र जुलै मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहता नीट आणि जेईई मेन परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर आयोजित केली आहे.