जनता दल-सेक्युलर (JD(S)) नेते सूरज रेवन्ना (Suraj Revanna) यांना पक्षाच्या एका पुरुष कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार (Karnataka Sex Scandal) केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात (Suraj Revanna Arrested) आली आहे. प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांचा मोठा भाऊ सूरज, यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांचे अनेक आरोप झाले आहेत. त्यांना 27 वर्षीय पक्ष कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. आरोप आहे की, सूरज रेवन्ना यांनी 16 जून रोजी हसन जिल्ह्यातील एका फार्महाऊसवर पक्षाच्या पुरुष कार्यकर्त्यावर कथीतरित्या अत्याचार केला. कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी रेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सूरज रेवण्णा यांनी आरोप फेटाळले
सूरज रेवण्णा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप फेटाळताना सूरजने दावा केला आहे की, सदर कार्यकर्त्याने त्यांना 5 कोटी रुपये मागितले होते. मात्र, इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिल्याने त्याने हा आरोप केला आहे. दरम्यान, सूरज रेवण्णाचा सहकारी शिवकुमार यानेही पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली.. शिवकुमार यांनी आरोप केला की पक्षाच्या कार्यकर्त्याने यापूर्वी नोकरीसाठी त्यांच्याकडे संपर्क साधला होता आणि नोकरी मिळवण्यात अयशस्वी झाल्यानंतर, 5 कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सूरजवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शिवकुमारने सांगितले की, कामगाराने सुरुवातीला नोकरीसाठी मदतीसाठी त्याच्याशी संपर्क साधला होता, आणि सूरजला रेफर केल्यानंतर त्याने ब्लॅकमेलचा अवलंब केला. (हेही वाचा, Former JD(S) MP Prajwal Revanna ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)
प्रज्ज्वल रेवण्णा यांना आधीच अटक
ही अटक JD(S) चे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या न्यायालयीन कोठडीनंतर झाली आहे. प्रज्ज्वल लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांमध्ये देखील अडकले आहेत. ते जेडी(एस)चे नेता आणि माजी पंतप्रधान एचडी यांचा नातू आहेत. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दरम्यान प्रज्ज्वल यांच्यावर गंभीर आरप झाले. या आरोपांची पुष्टी करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश झाले. त्यानंतर पक्षाने कारवाईचा भाग म्हणून JD(S) ने त्यांना पक्षातून निलंबित केले.
दरम्यान, प्रज्वलचे वडील एचडी यांच्याविरुद्ध देखील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एका महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे. जिने दावा केला होता की प्रज्वल आणि सूरज या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. एच.डी. माजी आमदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रेवन्ना यांना 14 मे रोजी अपहरण प्रकरणात आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, जेडी (एस) चा सहयोगी असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) या वादापासून स्वतःला दूर केले आहे. भाजपचे राज्य युनिटचे प्रमुख एस प्रकाश म्हणाले, "पक्ष म्हणून आम्हाला व्हिडिओंशी काहीही देणेघेणे नाही आणि आमच्याकडे कोणतीही टिप्पणी करायची नाही."