देशातील बँकांनी जनधन खाते धारकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकांनी या संदर्भात एक मोठी घोषणा करत असे म्हटले आहे की, जनधन खातेधारकांना पैसे काढणे किंवा भरण्यासाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहेत. बँकांनी बचत खात्यावर कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नसल्याचे म्हटले आहे.(कोरोना व्हायरसने मध्यम वर्गीय लोकांना केले कर्जबाजारी; घर चालवण्यासाठी 4 पैकी एका व्यक्तीने घेतले Loan, मुंबई व भोपाळ आघाडीवर)
IANS च्या बातमीनुसार, ICICI Bank ने सर्व बचत खाते आणि जनधन खात्यांवर कोणत्याही प्रकारचे चार्ज लावणार नसल्याचे म्हटले आहे. तर SBI, BOB, PNB यांनी सुद्धा जनधन खात्यावर कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बचत खात्यात मर्यादित रक्कम नसल्यास बँकांकडून शुल्क आकारले जातात.
नुकत्याच काही बातम्यांमधून असा दावा केला गेला आहे की, जनधन खात्यामधून प्रत्येक वेळी पैसे काढल्यास 100 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. मात्र सरकारने याबद्दल स्पष्टीकरण दिले असून अशा पद्धतीच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने केलेल्या फॅक्टचेक मध्ये असे म्हटले होते की, जनधन खात्यामधून मोफत बँकिंग सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही आहे. सर्व बँकांनी RBI च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. तसेच जनधन खात्या संबंधित चार्ज करण्यासबद्दल निर्देशन जाहीर केलेले नाहीत.(7th Pay Commission: दिवाळी पूर्वी केंद्रीय कर्मचा-यांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट, पाहा काय आहे ही खुशखबर!)
देशात सर्व नागरिकांना बँकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात पहिल्याच वर्षात पंतप्रधान जनधन योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या उद्देशामुळे प्रत्यके परिवाराने एक बँक खाते सुरु केले होते. कोरोना व्हायरसच्या काळात सरकारकडून थेट मदत दिली गेली. जनधन योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील मुलाचे सुद्धा खाते सुरु केले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत खाता सुरु केल्यास रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचा अपघाती विमा कवर आणि 30000 रुपयांचा लाइफ कवर आणि जमा रक्कमेवर व्याज मिळणार आहे.