जम्मू मधील रामबन येथे भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मिर येथील रामबन भागात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 3 लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रिपोर्टनुसार, टॅक्सी चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. तर चालकाची गाडी 500 फुट खोल नाल्यात पडली.

पोलिसांच्या मते, टॅक्सीमधील प्रवासी चंद्रकोट येथून राजगढ येथे जात होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. तर पोलिसांच्या मदतीला स्थानिक लोक धावून येत अपघातातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

ANI ट्वीट:

तपासादरम्यान 11 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दोन महिला आणि एका मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.