J&K: श्रीनगर येथे पांडच भागात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद
Jammu and Kashmir. (Photo Credits: IANS|File)

आज 20 मे रोजी जम्मू आणि काश्मीर (Jammu & Kashmir)  मधील श्रीनगर (Srinagar)  येथील पांडच (Pandach) याभागात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) दोन जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या पूर्वीच्या राजधानीची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील पांडच भागात सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाने पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर गोळीबार केला होता यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले होते, या जिवांना उपचारासाठी त्वरित रुग्णलयात नेण्यात आले, मात्र याठिकाणी उपचाराच्या दरम्यान या दोघांचेही निधन झाले. यानंतर गोळीबार करणाऱ्या दहशहतवाद्यांना शोधण्यासाठी सैन्याने हालचाली सुरु केल्या आहेत. Jammu & Kashmir: श्रीनगर येथे Hizbul Mujahideen च्या 2 दहशतवाद्यांना भारतीय सैन्याच्या जवानांकडून कंठस्नान

श्रीनगर मध्य काल म्हणजेच 19 मे रोजी, भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या सोबत संयुक्त ऑपरेशन करत हिझबुल मुजाहिद्दीन च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या घटनेचा पडसाद म्ह्णून आज घडलेला हा हल्ला असू शकतो. Jammu & Kashmir: भारतीय सैन्याचे मोठे यश; बडगाम येथील दहशतवादी तळ उद्धवस्त करून लष्कर ए तोयबा चा जहूर वानी याला अटक

ANI ट्विट

दरम्यान, कालच्या घटनेननंतर काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी आयएएनएसला माहिती देताना "श्रीनगरमध्ये जवळपास दोन वर्षानंतर अतिरेकी आणि सुरक्षा दलातील कारवाया सुरु आहेत असे सांगितले होते. दुसरीकडे भारतीय सैन्याच्या जवानांवर सुद्धा कोरोनाचे सावट आहे अशातच मागील काही काळात सतत दहशवादी हल्ले होत आहेत. यामुळे सैन्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.