Jammu & Kashmir: भारतीय सैन्याचे मोठे यश; बडगाम येथील दहशतवादी तळ उद्धवस्त करून लष्कर ए तोयबा चा जहूर वानी याला अटक
Lashkar E Taiba Terrorist Zahoor Wani (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir)  मधील बडगाम (Badgam) येथील अरिजाल खानसाहिब (Arizal Khansaib) या परिसरात असणाऱ्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले आहे. याठिकाणहून लश्‍कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) चा दहशतवादी जहूर वानी (Zahoor Wani) याला केली अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी असणारी हत्यारे आणि स्फोटके सुद्धा सैन्याच्या जवानांनी जप्त केली आहेत. जहूर वानी याचे घर या तळापासून अवघ्या 200 ते 300 मीटरवर होते. प्राप्त माहितीनुसार, जहूर वानी याच्यासोबत अन्य 4 जणांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. जुहूर हा लश्‍कर-ए-तोयबाच्या दहशवाद्यांना अन्नधान्य पुरवणे, लपण्यासाठी जागा देणे, त्यांना प्रवासासाठी वाहने उपलब्ध करून देणे अशी सर्व कामे करायचा. BSF मध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव; मागील 24 तासांत 11 जवान कोविड-19 पॉझिटीव्ह

जहूर वानी हा दहशतवाद्यांचा मदतगार आहे,त्याच्याविरुद्ध आता जम्मू- काश्मीर पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली आहे.मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी ऑपरेशन करण्याची तयारी भारतीय जवानांकडून केली जात होती. आज अंतिमतः या प्लॅनला यश आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, जम्मू काश्मीर खोऱ्यात मागील कित्येक दिवसांपासून अनेक लष्करी कारवाया होत आहेत. सुरुवातीला हंडवारा येथे झालेला दहशवादी हल्ला त्यानंतर शार्खली ख्रु भागात भारतीय सैन्याने दिलेले प्रत्युत्तर अशा अनेक घटना समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी हिज्बुल मुजाहुद्दीनचा कमांडर Riyaz Naikoo याला Beighpora भागात भारतीय सैन्याने ठार केले होते. त्यानंतर आता आणखीन एका दहशतवाद्याला ताब्यात घेऊन भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे.