Security Forces in Jammu and Kashmir (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीरच्या (Jammu & Kashmir)  श्रीनगरमध्ये (Srinagar)भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (Hizbul Mujahideen) या गटातील दोन दहशतवाद्यांना (2 Terrorist Killed) सैन्यातील जवानांनी गोळ्या घालून ठार केले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी (J&K Police) याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. जुना श्रीनगर परिसरातील नवाकदल येथे जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांनी सोमवारी रात्री अतिरेकींच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त शोध मोहीम सुरू केली. अतिरेकी ज्या ठिकाणी लपले होते तिथे वेढा घालून आज पहाटे दोन च्या सुमारास चकमक सुरु झाली. दहशतवादी आणि जवानांच्या चकमकीत दोघांना कंठस्नान घालण्यात सैन्य यशस्वी झाले तर चकमकी दरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान आणि सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला. उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचे नेते छोटे लाल दिवाकर आणि मुलगा सुनील यांची गोळ्या घालून हत्या; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आयजी काश्मीर विजय कुमार यांनी आयएएनएसला सांगितले की, श्रीनगरमध्ये जवळपास दोन वर्षानंतर अतिरेकी आणि सुरक्षा दलातील ही गोळीबार सुरू आहे. चकमकीनंतर बीएसएनएल सेवा प्रदाता वगळता मोबाइल इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग निलंबित केले गेले होते. सध्या ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दहशवाद्यांकडे सापडलेली हत्यारे, गोळ्या आणि स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, अगदी अलीकडेच म्हणजे 16  मे रोजी सुद्धा जम्मू काश्मीर मधील बडगाम येथील अरिजाल खानसाहिब या परिसरात असणाऱ्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले होते. याठिकाणहून लश्‍कर-ए-तोयबा चा दहशतवादी जहूर वानी याला अटक करण्यात आली होती. यानंतर अवघ्या काही दिवसात सैन्याने ही मोठी कारवाई केली आहे.