जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधील श्रीनगर (Srinagar) येथे दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा जवानांनवर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी लाल चौकात ग्रेनेड हल्ला केल्याने स्थानिक ठिकाणी 1 कश्मिरी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी जवानांकडून संपूर्ण ठिकाणाला घेराव घालण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी गेल्या 15 दिवसांपासून आतापर्यंत दुसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला केला आहे.कश्मीर मधील जवानांवर वारंवार दहशतवाद्यांकडून कुरघोडी करण्यात येत आहे. जवानांवर हा हल्ला जम्मू-कश्मीरला दोन विभागात विभाजन केल्यानंतर चार दिवसांनी करण्यात आला आहे. तर ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना नजीकच्या रुग्णयालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत असे सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला पण तो एका रस्त्याच्या किनाऱ्याजवळ जाऊन धडकला. त्यामुळे ग्रेनेटचा स्फोट होताच सामान्य नागरिक यामध्ये जखमी झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.(दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेवारस बॅगमध्ये आरडीएक्स सापडले)
#UPDATE Jammu and Kashmir: 15 people injured in a grenade attack in a market on Maulana Azad Road in Srinagar. https://t.co/LYAa5UHght pic.twitter.com/ic4LuXq8g4
— ANI (@ANI) November 4, 2019
तर दिवाळीपूर्वी 26 ऑक्टोबरला श्रीनगरमधील काकासराए येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. तसेच 24 ऑक्टोबरला सुद्धा कुलगाम येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान जखमी झाला होता.