संविधानाच्या कलम 35-A वर उद्या (सोमवार, 25/2/2019) रोजी होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फुटीरवादी नेत्यांनी आज (24/2/2019) बंदचे आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीर मधील तणावपूर्ण वातावरण आणि या बंदच्या दरम्यान कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून खूप प्रमाणात जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे श्रीनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसंच अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.
शनिवारी मोठी कारवाई करत पोलिसांनी जम्मू काश्मीर लिब्रेशनचे चीफ यासिक मलीक याला अटक केली होती. याचबरोबर जमात-ए-इस्लामी च्या जवळ अजून काही नेत्यांना अटक करण्यात आली. शनिवारी झालेल्या या अटकेवर ज्वाइंट रेसिडेंस लीडरशिप (JRL) ने विरोध करत बंद आवाहन केले आहे. याचदरम्यान सोपोर मध्ये पोलिस कॉन्फ्रेंसचे नेता अब्दुल गनी वकील यांच्या गाडीला विरोधकर्त्यांनी आग लावली. फुटीरवादी नेता यासिन मलिक अटकेत; हाय अलर्ट जारी करत 100 जवानांच्या तुकड्या जम्मू काश्मीर मध्ये दाखल
35-A अंतर्गत जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांच्या विशेष अधिकार मिळाले आहेत. या कलमानुसार, जम्मू काश्मीरच्या बाहेरील व्यक्तीस या राज्यात संपत्ती खरेदी करण्यास प्रतिबंध आहे. संविधानाच्या या कलमाला सुप्रीम कोर्टात आवाहन देण्यात आले आहे. हे कलम रद्द करण्यात येऊ नये अशी फुटीरवादी नेत्यांची भूमिका असल्याने त्यांनी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून गृह मंत्रालयाने 100 जवानांच्या तुकड्या श्रीनगर येथे पाठवल्या आहेत. यामध्ये CRPF च्या 35, BSF च्या 35, SSB च्या 10 आणि ITBP च्या 10 कंपन्याच्या समावेश आहे.
सीआरपीएफ च्या जागेवर बीएसएफची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर येथे 4 आणि बडगाम जिल्ह्यात एका ठिकाणी BSF ची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये न्यायव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरणासाठी ही पाऊले उचलण्यात आली आहेत.