फुटीरवादी नेता यासिन मलिक अटकेत; हाय अलर्ट जारी करत 100 जवानांच्या तुकड्या जम्मू काश्मीर मध्ये दाखल
Jammu and Kashmir Liberation Front Chairman Muhammad Yasin Malik Arrested in Srinagar. (Photo Credit: IANS)

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने फुटीरवादी नेता यासिन मलिक याला (Yasin Malik) शुक्रवारी (22/2/2019) रात्री अटक केली. यासीन मलिक जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख आहे. शुक्रवारी रात्री मायसूमा येथील आवास येथून अटक केली. अटकेनंतर यासीन याला कोठीबाग ठाण्यात नेण्यात आले आहे. यासिन मलिक लवकरच अटक करणे गरजेचे होते. कारण येत्या दोन दिवसात म्हणजेच सोमवारी जम्मू-काश्मीर येथील कलम 35-A वर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या कलमानुसार जम्मू-काश्मीर बाहेरील व्यक्तीस जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी करु शकत नाही.

या कलमाच्या सुनावणीनंतर जम्मू काश्मीर येथील वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अटक लवकरच करणे गरजेचे होते.

जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून गृह मंत्रालयाने  100 जवानांच्या तुकड्या श्रीनगर येथे पाठवल्या आहेत. यामध्ये CRPF च्या 35, BSF च्या 35, SSB च्या 10 आणि ITBP च्या 10 कंपन्याच्या समावेश आहे.

गृह मंत्रायलयाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने 22 फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा आणि सरकारी सुविधा काढून घेतली आहे. याशिवाय जम्मू काश्मीरच्या 155 राजकीय नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यात यासिन मलिकचे नाव होते.