जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, जवानांना हाय अलर्ट जाहीर
Indian Army (Photo Credits-Twitter)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) बद्दल मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan) संतापला आहे. त्यामुळे आता जम्मू-कश्मीर येथे दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने भारतीय जवानांना (Indian Army) हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटी येथे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घाटी येथे बदलत्या परिस्थितीमुळे पाकिस्ताची चिंता अधिक वाढू लागल्याने दहशतवादी सीमापार करण्यासाठी गोळीबार करु लागले आहेत. मात्र पाकिस्तानची ही चाल त्याच्यावर उलटली असून जवानांनी पाकिस्तानच्या काही जवानांना ठार केले आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीर विभाजन विधेयेक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानची चिंता अधिकच वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला कश्मीर मधील शांतता आणि वेगाने बदलत असलेली परिस्थिती पाहता पाकिस्तानचा संताप अधिक वाढत चालला आहे.त्यामुळे जवानांना आता पूर्णपणे हाय अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(स्वातंत्र्य दिनाच्या वेळी शस्रसंधीचे उल्लंघन, भारतीय जवानांकडून 3 पाकिस्तानी जवान ठार)

सुब्यात दहशतवादी घुसखोरी करत सीमेवर सातत्याने गोळीबार करत आहेत. मात्र जवान या गोळीबाराला सडेतोड उत्तर देत आहेत. स्वातंत्र्य दिनावेळी सुद्धा पाकिस्तानकडून पुंछ येथे शस्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरु केला. यामध्ये पाकिस्तानचे तीन जवान ठार झाले आहेत. भारताने पाकिस्तानच्या या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच रात्रीच्या वेळी सुद्धा सीमापार करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात आला. मात्र तेव्हासुद्धा भारतीय जवानांनी त्यांना तेथून पळवून लावले.