जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात आज (5 मार्च) रात्रीपासून चकमक सुरु झाली. त्राल परिसरात सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षारक्षकांना यश आले आहे.
मंगळवारी (5 मार्च) रात्री दक्षिण काश्मीर मधील त्राल परिसरात काही दहशतवादी लपलेले असल्याची सूचना सुरक्षारक्षकांना मिळाली. त्यानंतर केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त टीमने शोध मोहिम सुरु केली. या दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमकीला सुरुवात झाली.
Jammu & Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Tral. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/e8lu8WCivb
— ANI (@ANI) March 5, 2019
एका अधिकाऱ्याने सांगितले की, "त्राल परिसरात सुरक्षारक्षक आणि दहशतावाद्यांमध्ये गोळीबाराला सुरुवात झाली. सुरक्षारक्षकांनी त्या परिसराला घेरले आणि दहशतवाद्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यादरम्यान मोबाईल, इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली."
Jammu & Kashmir: Encounter breaks out between security forces and terrorists in Tral. More details awaited. pic.twitter.com/M9OS1S1sqx
— ANI (@ANI) March 4, 2019
काही दिवसांपूर्वी कुपवाडा जिल्ह्यात 56 तास चाललेल्या चकमकीनंतर दोन दहशतवांद्याचा खात्मा करण्यात आला. त्यात सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्यासह पाच सुरक्षारक्षक शहीद झाले. तसंच एका स्थानिक नागरिकाचा देखील मृत्यू झाला.