Indian Army (Photo Credit: IANS)

जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील त्राल (Tral) येथे दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या भागात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली आहे. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी संपूर्ण परिसर घेरला आणि सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्याचदरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षारक्षकांवर जोरदार गोळीबाराला सुरुवात झाली. या गोळीबाराला सुरक्षारक्षकांनी देखील सडेतोड उत्तर दिले. हाती आलेल्या वृत्तानुसार, जंगलात दोन-तीन दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी रविवारी सुरक्षारक्षकांनी शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अंसार गजवात-उल-हिंद च्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात अहमद मीर, रफी हसन मीर, सुहेल अहमद भट आणि अब्दुल अजाद अहमद यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यानंतर या महिन्यात एजीएच दहशतवाद्यांसोबत दुसरी चकमक झाली. गेल्या महिन्यात पुलवामा येथे झालेल्या चकमकीत नव्या दहशतवादी संघटनेचे कमांडर जाकिर मूसा याचा खात्मा करण्यात आला होता.

ANI ट्विट:

यापूर्वी शनिवारी बारामूला जिल्ह्यात सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद च्या पाकिस्तानी दशहतावाद्याचा खात्मा करण्यात आला.