70th Republic Day: भारतीय प्रजासत्ताक दिनाला गालबोट लावण्यासाठी पाकिस्तान आणि पाकिस्तानचे दहशतवादी जंग जंग पछाडत आहे. मात्र, भारतीय लष्कराचे जवान प्रत्येक वेळी त्यांचा प्रयत्न केवळ हानूनच पाडत नाहीत तर, उधळून लावत आहेत. शनिवारी (26 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir)येथे भारीतय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी हा कट दोन वेळा उधळून लावला. या वेळी श्रीनगर आणि पुलवामा या ठिकाणी भारतीय जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांना ठार केले. श्रीनगर येथील खोनमोह परिसरातीसल शाळेत काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे जवान (Indian Army) आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Polic) संयुक्त मोहिम राबवली आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच लष्कारचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेते. जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला वेढा घातला. या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या आधी गुरुवारी पाकिस्तानने पुंछ, राजोरी सेक्टर आणि सुंदरबनी या परिसरासह लाईन ऑफ कंट्रोल (LoC) जवळ चार ठिकाणी शस्त्रसंधिचे उल्लंघन केले. या ठिकाणी त्यांनी हलक्या शस्त्रांनी गोळीबार केला. तसेच मोटार माध्यमातून काही तोफांचा मारा केला. भारतीय जवानाने पाकिस्तानची ही नापाक हरकत उधळून लावली. (हेही वाचा, Republic Day 2019: प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी पदार्थ कसे बनवाल? (Videos)
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सीमेवर बर्फ साचले आहे. त्यामुळे इथे नैसर्गिक मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक बदल पाहायला मिळत आहे. असे असतानाही पाकिस्तानने आपली नापाक हरकत कायम ठेवत घुसखोरी आणि शस्त्रसंधिचे उल्लंघन कायम ठेवले आहे. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथील अग्रिम चौकीवर गोळीबार केला. पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केले आहे. या मोहिमेखाली केलेल्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांना टीपण्यात भारतीय सैनिकांना यश आले आहे.