जम्मू -काश्मिर येथील चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश
जम्मू -काश्मिर येथील चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश (Photo Credits-ANI)

जम्मू-काश्मिर (jammu-Kashmir) मधील हंदवाडा (Handwara) येथे भारतीय सैनिक आणि दहशतवादी यांच्यामध्ये पहाटेपासून गोळीबार सुरु आहे. या गोळीबारादरम्यान एका दशहतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. तसेच परिसरातील काही ठिकाणी अन्य दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनकडून शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे.

भारताच्या सीमारेषेवर दररोज पाकिस्ताची कुरघोडी वाढत आहे. तर आज गुरुवारी (7 मार्च) पहाटेपासून हंदवाडा येथे गोळीबार सुरु करण्यात आला. परिसरात दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळताच जवांनानकडून शोधमोहिम सुरु करण्यात आली. तसेच गोळीबार सुरु असल्याने मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

तर मंगळवार पासूनच दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु करण्यात आला होता. या चकमकीत त्यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते.तसेच हंदवाडा येथील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेली तीन दिवस चकमक सुरु आहे.