भारतीय सैनिकांकडून जीनत-उल-इस्लाम संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Terrorists Gunned Down by Security Forces | Representational Image (Photo Credits: PTI)

जम्मू काश्मीर (Jammu-Kashmir) मधील कुलगाम (Kulgam district) येथे भारतीय सैनिकांना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सैनिकांनी कुलगाम येथील काटापोरा येथे दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच कंठस्नान घातलेले दहशतवाद्यांमधील एक हिज्बुल कमांडर जीनतउल इस्लाम (Zeenat Ul Islam) आणि शकील अहमद अशी त्यांची नावे आहेत. या हल्लानंतर सैनिकांकडून अधित तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय लष्कराकडून खात्मा करण्यात आलेल्या दशहतवाद्यामधील जीनउल इस्लाम हा बुरहान वानी याचा जवळीक होता. तसेच 2017 रोजी मोस्टवाँटेंड लिस्टमध्ये दशहतवादी जीनतउल इस्लाम याचे नाव देण्यात आलेले होते. जीनतउल इस्लाम हा खूप क्रुर दहशतवादी म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी इस्लाम याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.

शनिवारी सैनिकांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करुन जवानांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांमध्ये गोळीबार सुरु होऊन दोन दहशतवाद्यांचा यशस्वीपणे भारतीय सैनिकांकडून खात्मा करण्यात आला आहे.