पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सीरियल रेपिस्ट जिवाणू याला अटक; महिलांसह अल्पवयीन मुलींवरही अत्याचार केल्याची कबुली
Serial Rapist | (Photo Credits: Flickr)

जयपूर (Jaipur) येथे सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा सीरियल रेपिस्ट (Serial Rapist) असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. सिकंदर उर्फ जीवाणू असे या आरोपीचे नाव आहे. जीवाणूने पोलिसी चौकशीत सांगितले की, तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्याबद्दल माहिती देणारांसाठी यमदूत ठरेन. जिवाणू याने पोलिसांना केलेल्या चौकशीत सांगितले की, आतापर्यंत त्याने 45 पेक्षा अधिक लोकांचा लैंगिक छळ केला आहे. यात अनेक पुरुष, तृतीयपंथी आणि महिलांचा समावेश आहे.

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जिवाणू उर्भ सिकंदर याने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यांसाठी तो जेलमधून बाहेर आल्यानंतर यमदूत बनेन. पोलीसही त्याची थमकी ऐकून आश्चर्यचकीत झाले. तो म्हणाला की, जयपूर येथील शास्त्रीनगर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तो तिची हत्या करु इच्छित होता. त्या पीडितेचीच हत्या केली नाही, ही आपली सर्वात मोठी चूक होती, असेही आरोपीने म्हटले आहे.

पोलिसांकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिवाणूने आतापर्यंत सुमारे 25 पेक्षा अधिक अल्पवयीन मुलांना आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. सीरियल रेपीस्ट असलेल्या जिवाणू याने आतापर्यंत 40 पुरुष आणि तृतीयपंथी आणि काही महिलांचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले आहे. त्याने म्हटले आहे की महिलांच्या तुलनेत तो कमी वयाच्या पुरुषांचे अनैसर्गिक लैंगिक शोषण करत असे. आरोपी सिकंदर उर्फ जिवाणू याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असे.

आरोपी सिकंदर उर्फ जिवाणू हा त्याचा दुसरा सहकारी रफीक याच्यासोब मिळून लूटालूट आणि चोरीची कामे करत असे. दोघांमध्ये रात्रीच्य वेळी कोण अधिक चोरी करतो यात स्पर्धा लागत होती. आरोपी सिंकत याने आपले नाव जिवाणू तर रफीक याने आपले नाव कीटाणू असे ठेवले होते. जीवाणू हा अंमली पदार्थांची तस्करीही करत असे. (हेही वाचा, भयानक! तरुणाच्या गुप्तांगामध्ये प्रेशर पंपने भरली हवा)

पोलीस चौकशीत जिवाणू याने सांगितले की, 1 जुलै रोजी शास्त्री नगर येथील अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो जयपूर येथील एका सलूनच्या दुकानात लपला होता. मीडियात सीसीटीव्ही फुटेज पाहून तो फरार झाला होता. त्यानंतर तो सांगानेर येथे जाऊन फुटपातवर झोपला. 4 जुलै रोजी आरोपी जिवाणू टोंककडे गेला. त्यानंतर 5 जुलै रोजी देवली येथे त्याने एका सलूनवाल्यासोबत भांडन केले. तिथेही तो मॅनेजर सोहन लाल याला याच्यावर गोळी मारुन 20 हजार रुपये घेऊन पसार झाला. देवली येथे चोरी केल्यानंतर तो आपला मित्र कोटा येथे आपल्या मित्राकडे लपला होता.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा (जिवाणू) मोबाईल नंबर लोकेशन ट्रॅक करुन त्याला बेड्या ठोकल्या. शनिवारी सायंकाळी 5 वाजता रेपिस्ट सिंकदर कोटा येथील भीमगंज येथे बाबू चाहावाला याच्या टपरीवर आला होता. पोलिसांनी तेथे सापळा लावला होता. पोलीस चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. 1 जुलै आणि 22 जून रोजी जयपूर येथील शास्त्रीनगर परिसरात 7 वर्ष आणि 4 वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचाराचे कृत्य केले होते. 2015 मध्येही जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने भट्टा वस्ती परिसरात दोन मुलांसोबत छेडछाड केली होती. त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तो पोलिसांवरही हल्ला करुन पसार होण्यास यशस्वी झाला होता. आतापर्यंत त्याच्यावर 12 गुन्हे दाखल झाले असून, तो 6 वेळा तुरुंगात जाऊन आला होता.