(Photo credit: archived, edited, representative image)

वाराणसी (Varanasi) मध्ये एका मुलीवर 23 जणांकडून बलात्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर तरूणीने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करताना हे प्रकरण खोटं आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सहा सदस्यांची SIT सध्या काम करत आहे. Deputy Commissioner of Police rank officer त्याचे नेतृत्त्व करत आहे. अनेक आरोपींच्या कुटुंबियांनी व्हिडिओ, छायाचित्रे आणि इंस्टाग्राम चॅट असलेले पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पुढील अटकेवर तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. पुरावे सध्या तक्रारदाराच्या आरोपांचे खंडन करतात असा त्यांचा दावा आहे, ज्यामुळे या प्रकरणाबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे.

बलात्काराच्या आरोपांनंतर एसआयटी ची स्थापना

17 एप्रिल रोजी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना वाराणसीचे पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, FIR मध्ये नाव असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील लोक आणि अटक केलेल्यांनी पोलिस ठाण्यात काही पुरावे आणले आहेत ज्यात 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घाटांवर आणि इतर ठिकाणी महिलेला आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याचे व्हिडिओ होते. अग्रवाल पुढे म्हणाले की, आरोपींच्या कुटुंबियांनी असाही दावा केला आहे की त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. ते असेही आरोप करत आहेत की जर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार होत असेल तर तिने आधी पोलिसांकडे का संपर्क साधला नाही?

6 एप्रिल रोजी नोंदवलेल्या तिच्या FIR मध्ये, तक्रारदाराने आरोप केला आहे की 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 23 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तक्रारदार महिलेने असेही म्हटले आहे की त्या आठवड्यात तिला ड्रग्ज पाजण्यात आले, अपहरण करण्यात आले आणि जबरदस्तीने अनेक ठिकाणी हलवण्यात आले. पण, कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात एक नवीन वळण आले आहे ज्यामध्ये 19 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याबद्दल 23 पुरूषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आरोपीच्या कुटुंबियांनी सादर केलेल्या नवीन डिजिटल पुराव्यांवरून तक्रारदार मुक्तपणे फिरताना, सार्वजनिक ठिकाणी हसताना, मोटारसायकल चालवताना आणि कथित अपहरण केलेल्या जागी असताना सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येत आहे. नक्की वाचा: Varanasi Shocker: वाराणसी मध्ये 7 दिवसांत 23 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा 19 वर्षीय मुलीचा दावा; 6 जण अटकेत .

पोलिस अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, नवीन पुराव्यांमध्ये तक्रारदार सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना आणि काही आरोपींसोबत गप्पा मारताना दिसत आहे. 1 एप्रिल रोजीच्या एका व्हिडिओमध्ये तक्रारदार कॉन्टिनेंटल कॅफेच्या बाहेर दिसत आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये तक्रारदारासोबत काही पुरूष (सोहेल, आयुष आणि दानिश) होते ज्यांच्यावर तिने बलात्काराचा आरोप केला होता, जे स्वेच्छेने घडत असल्याचे दिसून येते. अहवालानुसार, हा व्हिडिओ शाहिद नावाच्या दुसऱ्या आरोपीने शूट केला होता. आणखी एका पुराव्यानुसार ती महिला कॅफे कर्मचारी जाहिदसोबत गप्पा मारताना दिसत आहे.