IRCTC | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) रेल्वेत जेवणाची सोय केलेली असते. तसेच प्रवासी काही वेळेस अ‍ॅपवरुन जेवण ऑर्डर करतात. मात्र प्रवाशांनी रेल्वेत मोबाईलवरुन मागवलेल्या फूड ऑर्डरचे अ‍ॅपहे अनधिकृत असल्याचे आयआरसीटीसी कडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करताना ट्रॅव्हल खाना किंवा रेल यात्री या अनधिकृत संकेतस्थळावरुन जेवण मागवल्यास त्याबद्दलच्या गुणवत्तेला आयआरसीटीसी जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ऑनलाइन अ‍ॅप आणि बऱ्याच वेबसाइट्स रेल्वे प्रवासात जेवण पुरवतात. अनेकदा जेवणातल्या तक्रारी रेल्वेकडे प्रवाशांकडून केल्या जातात. परंतु त्याचा काही उपयोग नाही, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.(IRCTC ची नवी सुविधा, पैसे न भरता प्रवाशांना काढता येणार रेल्वे तिकिट)

मात्र प्रवाशांनी www.ecatering.irctc.co.in या संकेतस्थळावरुन मागवावे असे सांगण्यात येत आहे. तर रेल यात्री, रेल रसोई, खाना गाडी, फूड इन ट्रेन यांसारखे अ‍ॅप  हे अनधिकृत असल्याचे आयआरसीटीसी कडून सांगण्यात आले आहे.