आयएनएक्स मीडिया' (INX Media Case) शी निगडीत भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज (21 ऑगस्ट) चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही (Supreme Court) दिलासा मिळालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई कडे सोपवण्याचा निर्णय न्यायाधीशांनी घेतला आहे. पी चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
सीबीआयची टीम मागील दोन दिवसांपासून चिदंबरम यांच्या घरी हजेरी लावत आहेत. मात्र ते बेपत्ता आहेत. आता लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता दाट होत आहे. यापूर्वी न्यायालयात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीनदेखील नाकारल्याने आता त्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.
ANI Tweet
Senior lawyer Kapil Sibal couldn't mention his urgent listing of P Chidambaram's plea before CJI, as 5-judge Constitution bench of the Supreme Court, headed by Chief Justice of India (CJI) Ranjan Gogoi, commences day-to-day hearing on Ayodhya case pic.twitter.com/K8ILzS4dIp
— ANI (@ANI) August 21, 2019
अटकपूर्व जामिनासाठी याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील गौर यांनी 25 जानेवारीला निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी त्यांनी ही याचिका फेटाळला. त्यानंतर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या त्यांचा मोबाईलदेखील बंद आहे.