आयएनएक्स मीडिया (INX Media Case) भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग (Money laundering Case) प्रकरणात आरोपी ठरविण्यात आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (Former Union Finance Minister P Chidambaram) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Cour) अटकपूर्व जामीन फेटळला आहे. न्यायालयाने आज (मंगळवार 20 ऑगस्ट 2019) हा निर्णय दिला. या प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा मिळणार की नाही याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर न्यायालयाने चिदंबरम यांना दिलासा दिलाच नाही.
सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी चिदंबरम यांच्यावर भ्रष्टाचाराचा तर, अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement)ने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही प्रकरणात चिदंबरम यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यामुर्ती सुनील गौड यांनी सर्व पक्षकारांचे म्हणने ऐकल्यानंतर चिदंबरम यांच्या अंतरीम जामीन याचिकेवर 25 जानेवारीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. (हेही वाचा, मुंबई: राज ठाकरे 22 ऑगस्टला 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जाणार; मनसे कार्यकर्ते करणार शक्तीप्रदर्शन)
एएनआय ट्विट
Delhi High Court dismisses both anticipatory bail pleas of Former Union Finance Minister P Chidambaram in connection with INX Media case. pic.twitter.com/Gbt4Py4y8m
— ANI (@ANI) August 20, 2019
ईडीने माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना यूपीए सरकार कार्यकाळात झालेल्या कथीत विमान घोटाळ्याशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी 23 ऑगस्ट रोजी बोलावले आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 2006 मध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विमान खरेदी व्यवाहारांशी संबंधित आहे. एअर इंडियाला झालेला आर्थिक तोटा आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या एअर स्लॉटच्या निर्धारात कथित अनियमिततेशी संबंधित आहे.