International Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)
PM Narendra Modi Yoga Video (Photo Credits: Twitter)

भारताने जगाला दिलेल्या देणग्यांपैकी एक आरोग्यवर्धक शिकवण म्हणजे योग अभ्यास, योगा मुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्य देखील टिकून राहण्यास मदत होते. मात्र अनेकदा आपण भारतीयच या शरीरासाठी फायद्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करतो. म्ह्णूनच पुन्हा एकदा भारतीयांना आरोग्याची जपणूक करणारी ही सवय लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या (International Yoga day 2019)  औचित्याने एक ऑनलाईन योगा सीरिज (Online Yoga Series) सुरु केली आहे. ज्यामधून मोदी हे दररोज सकाळी एका नव्या योगासनांची माहिती, करावयाची पद्धत आणि फायदे सांगणारा एक व्हिडीओ शेअर करतात. आज या सीरिजमध्ये मोदींनी भुजंगासन (Bhujangasana)  कसे करावे याचे धडे दिले आहेत. यासोबतच भुजंगआसन केल्याने तुमच्या पाठीला फायदा होतो त्यामुळे दररोज सकाळी हे आसन करायलाच हवे असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.

नरेंद्र मोदी योगा सीरिज भुजंगासन व्हिडीओ (Watch Video)

या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्याने या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.हे आसन केल्याने पोटाचे स्नायू ताणले जातात,  त्यामुळे पचनेंद्रियांवर चांगले परिणाम होतात. तसेच पाठीच्या कण्यातील स्नायू कार्यक्षम व पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते . International Yoga Day 2019: नरेंद्र मोदी सांगत आहेत वक्रासनाचे फायदे (Watch Video)

 

दरवर्षी प्रमाणे येत्या 21 जून ला आंतरराष्ट्रीय स्तरावर योगा दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. याच पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हा ऑनलाईन उपक्रम सुरु केला आहे. या व्हिडीओ मधून मोदींचे ऍनिमेटेड व्हर्जन तयार केले असून या माध्यमातून योगासनांचे धडे दिले जातात.