Independence Day 2022: दिल्ली आणि जम्मू कश्मीर मध्ये Lashkar-e-Khalsa कडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता; Intelligence Bureau चा अलर्ट
IB (Representative Image ) Credits: File Photo

भारताच्या स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशनच्या (Independence Day 2022) पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर आणि देशाची राजधानी दिल्ली मध्ये 'Lashkar-e-Khalsa' कडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अंदाज Intelligence Bureau कडून जारी करण्यात आला आहे. भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी IS कडून Lashkar-e-Khalsa ची स्थापना करण्यात आली आहे.

आय बी कडून दहा पानी अहवाल देण्यात आला आहे. यामध्ये राजस्थानच्या उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावती मधील घटनेचा उल्लेख करत यावरून अशा संघटना कशाप्रकारे दंगली पेटवू शकतात याचा अंदाज घ्यावा असे संकेत दिले आहेत. हे देखील नक्की वाचा: Azadi Ka Amrit Mahotsav: 5 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; केंद्र सरकारचा मोठा निर्णय .

जपान मध्ये भर सभेत Shinzo Abe यांचा खून कसा झाला या घटनेचा हवाला देत लाल किल्ल्यावर तिरंगा फडवण्याच्या कार्यक्रमावेळेस पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिक दक्षता घ्यावी असं म्हटलं आहे. यंदा लाल किल्ला परिसरात एकूण सुरक्षा वाढवली जाणार आहे. ध्वजारोहणाला देखील मर्यादित लोकं उपस्थित असतील. भारतात राहणार्‍या सुदान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांवरही हल्ला होऊ शकतो असेही आयबी ने नमूद केले आहे.